जीमेलचे मोबाइल अ‍ॅप नुकतेच अद्ययावत करण्यात आले असून यामध्ये आता आपल्याला मायक्रोसॉफ्टचे डॉक्युमेंट एडिट करणे शक्य होणार आहे. यामुळे फोनमध्ये डॉक्युमेंट फाइल सेव्ह करा आणि नंतर ती एडिट करून पुन्हा फॉरवर्ड करा. असा खटाटोप करण्याची गरज भासणार नाही.
अ‍ॅप अद्ययावत करण्यापूर्वी तुम्ही जीमेलच्या इनबॉक्समध्ये जा. तेथे डॉक्युमेंट फाइल असलेला एखादा ई-मेल ओपन करा. त्या अटॅचमेंटच्या खाली आपल्याला डाऊनलोड आणि सेव्ह टू ड्राइव्ह असे दोनच पर्याय दिसतील. यानंतर तुम्ही जीमेल अ‍ॅप अद्ययावत करा आणि पुन्हा तोच ई-मेल ओपन करा. तुम्हाला त्याच्याखाली ‘एडिट’ असा तिसरा पर्याय आलेला दिसेल. या पर्यायावर तुम्ही क्लिक केले की गुगल आपले ते डॉक्युमेंट गुगल ड्राइव्हमध्ये सेव्ह करून घेते. यानंतर ती अटॅचमेंट गुगलच्या डॉक्युमेंट फॉरमॅटमध्ये कनव्हर्ट केली जाते. यानंतर पुन्हा एकदा एडिट आयकॉन तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला ते संबंधित डॉक्युमेंट एडिट करता येणे शक्य होणार आहे. यामुळे यापूर्वी जीमेल अ‍ॅपमधील रीड ओन्ली हा फॉरमॅट एडिटमध्ये कनव्हर्ट होणार आहे.
संगणकावरही हा पर्याय लवरकच उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठीचे क्रोम एक्स्टेन्शन नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपले डॉक्युमेंट गुगल डॉक्युमेंटच्या फॉरमॅटमध्ये कनव्हर्ट न होता ते मायक्रोसाफ्टच्या फॉरमॅटमध्येच कायम राहणार आहे.
या नवीन सुविधेसाठी गुगलने आपल्या डॉक्सच्या यादीत पंधरा नवीन फॉरमॅट्सची यादी अपलोड केली आहे. जेणेकरून त्याचा वापर करून विविध प्रकारच्या फॉरमॅटमधील डॉक्युमेंट्स आपल्या इनबॉक्समध्ये एडिट करण्यासाठी ओपन होऊ शकतात. गुगलच्या या नव्या सुविधेमध्ये डॉक्युमेंट्समधील टेम्पलेट्स फाइल्स, मायक्रो एनेबल्ड फाइल्स, टेबल्स, इमेजेस आणि चार्टस आदी गोष्टी दिसणे अगदी सोपे होणार आहे.