तालुकास्तरीय लोकशाहीदिनाच्या धर्तीवर तसेच नागरीकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेने परिमंडळस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यास सुरुवात केली असून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर लोकशाहीदिन घेण्यात येणार आहे.  
येत्या १७ डिसेंबरला परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नागरिकांनी येत्या ३ डिसेंबपर्यंत मुंब्रा, नौपाडा, माजिवाडा येथील प्रभाग समिती कार्यालयामध्ये परिमंडळ उपायुक्तांकडे निवेदन सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.