पुणे विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणापासून ते इतर अनेक गैरप्रकार उघडकीस येत असताना गुरुवारी सकाळी वेगळाच प्रकार विद्यापीठात पाहायला मिळाला. विद्यापीठातील विद्यार्थी व अनेक नागरिक सकाळी चालण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना आरोग्य केंद्राजवळ रस्त्याला लागूनच गोल मांडलेल्या खुच्र्या आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसल्या. रात्री झालेल्या ‘ओल्या’ पार्टीच्याच त्या खुणा होत्या. त्याचे फोटो घेतले जात असल्याचे समजल्यावर एक मोटार आली आणि त्यातून उतरलेल्या लोकांनी घाईघाईने सर्व साफ केले.. अर्थातच, तोवर उशीर झाला होता! (छाया – सुनील दुधे / सागर नरेकर)