20 September 2020

News Flash

आता रिमोट सेन्सिंगद्वारे पाणी मीटर वाचन..

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी देयक आकारण्यासाठी स्वयंचलित मीटर बसवून रिमोट सेन्सिंगद्वारे मीटर वाचन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अंबरनाथ आणि

| June 15, 2013 12:46 pm

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी देयक आकारण्यासाठी स्वयंचलित मीटर बसवून रिमोट सेन्सिंगद्वारे मीटर वाचन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अंबरनाथ आणि बदलापूरमधील नऊ हजार ग्राहकांना या योजनेचा लाभ होणार असून त्यांना ही सेवा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच नेमण्यात आलेल्या एजन्सीमार्फत मीटरची पाच वर्षे विनामूल्य देखभाल दुरुस्तीही केली जाणार आहे. या योजनेसाठी एकूण साडेनऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दीड वर्षांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जीवन प्राधिकरणाच्या एकूण ३७ हजार ५०० नळजोडण्या असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्राहकांना ही सेवा देण्यात येईल. मोबाइल तंत्रज्ञानावर आधारित या मीटर वाचन प्रणालीत प्रत्येक मीटरमध्ये एक सीमकार्ड बसविण्यात येणार आहे. मीटर वाचक एका जागी उभे राहून ३०० मीटर परिघातील सर्व मीटरचे वाचन केवळ एका क्लिकद्वारे करू शकेल. सध्या मीटर वाचनावरून ग्राहक आणि जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी यांच्यात सातत्याने वाद होतात. या स्वयंचलित यंत्रणेत तक्रारींना वावच राहणार नसून या व्यवहारात शंभर टक्के पारदर्शकता येणार आहे.
चोरी आणि गळती बंद
या स्वयंचलित मीटर वाचन प्रणालीमुळे पाणी चोरी आणि गळतीला आळा बसणार आहे. काही ग्राहक मीटर वाचनामध्ये फेरफार करून पाणी चोरी करण्याचा प्रयत्न करतात. अनधिकृत जोडण्यांमुळेही बरेच पाणी वाया जाते. आता या प्रणालीमुळे असे प्रकार घडणे शक्य नाही. शिवाय सध्या एका इमारतीत अथवा सोसायटीत चार-पाच मीटर आहेत. या योजनेत एकच सामायिक मीटर बसविण्यात येणार असल्याने देयक आकरणी करणे अधिक सुलभ होणार आहे.  
लवकरच ऑनलाइन बिल भरण्याची सोय
त्याचप्रमाणे बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा ग्राहकांचा त्रास वाचावा म्हणून ऑनलाइन सुविधाही येत्या काही दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी महावॉनरबिल डॉटकॉम नावाचे संकेतस्थळ विकसित केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:46 pm

Web Title: now water meter reading by remote sensing
Next Stories
1 एका निवृत्त बँकरचे ‘सोशल’ नेटवर्किंग..!
2 विख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अजित नातू यांचे निधन
3 नवी मुंबईत राष्ट्रवादीचे ‘वन टाइम प्लॅनिंग’ वादात
Just Now!
X