महापालिकेच्या स्थायी सभापतिपदासाठी काँग्रेस अंतर्गत असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेस असून सध्या ‘वेट अॅन्ड वॉच’ ही भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. स्थायी सभापती निवडीसाठी १८ ऑक्टोबर रोजी बठक बोलाविण्यात आली आहे.
सभापतिपदासाठी संजय मेंढे, राजेश नाईक, किशोर लाटणे हे काँग्रेसचे सदस्य इच्छुक आहेत. संजय मेंढे यांना विकास महाआघाडीच्या कालखंडात सभापतिपदाची संधी मिळाली मात्र न्यायालयीन वादात त्यांना सत्ता भोगता आली नाही. त्यामुळे त्यांनी या पदासाठी हक्क सांगितला आहे. मात्र याबाबत पक्ष नेते मदन पाटील ऐन वेळी कोणती भूमिका घेतात यावरच गणित अवलंबून आहे.
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून यापकी ९ सदस्य सत्ताधारी काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीचे ५ आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे २ सदस्य आहेत. समितीत काँग्रेसचे बहुमत असले तरी काँग्रेसअंतर्गत सभापतिपदावरून निर्माण होणाऱ्या बेदिलीचा लाभ उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. संधी मिळाली तर सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून माजी महापौर मनुद्दीन बागवान िरगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी गणित जमत असेल तर उमेदवारी दाखल करा अन्यथा िरगणात उतरू नका असा सल्ला दिला आहे.