स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिकीकरणात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या कल्याणजवळील मोहने येथील नॅशनल रेयॉन-अर्थात एनआरसी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक संमेलन शनिवार २६ जानेवारी रोजी कंपनी वसाहतीच्या शाळेत आयोजित केले आहे.
आता एनआरसी कंपनी बंद असली तरी तेव्हा वसाहतीत राहून गेलेले हजारो कुटुंबीय अजूनही तो सुवर्णकाळ विसरलेले नाहीत. १९६० ते २००० या चार दशकात कंपनीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना आपल्या आत्मस्वकियांना, मित्रांना एकत्र भेटता यावे या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात एनआरसी शाळेस गतवैभव मिळवून देण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचाही संयोजकांचा प्रयत्न आहे. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी संपर्क-शेखर देशमुख-९८२०९०३५४२, सुजीत गवई-९८६७९४४५५५.