07 March 2021

News Flash

रिक्त पदे भरण्याची परिचारिकांची मागणी

परिचारिकांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावी या मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिकांनी शासनाच्या धोरणाविरोधात

| November 29, 2013 09:44 am

परिचारिकांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावी या मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिकांनी शासनाच्या धोरणाविरोधात बंड पुकारले आहे. हिवाळी अघिवेशनादरम्यान १८ डिसेंबरला ३ हजार परिचारिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस फेडरेशन असोसिएशनने दिला आहे.
नागपुरात मेयो, मेडिकलसह राज्यात परिचारिकांची ४ हजारांवर पदे रिक्त आहेत. कमी परिचारिकांच्या भरवशावर रुग्ण सेवेचे काम सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इमारती उभ्या होत आहेत, पण परिचारिका, सफाई कामगार यांची संख्या कमी आहे. यावरून मुनष्यबळ कमी आहे ते मागू नका, असे शासनाचे अलिखित नियम आहेत. भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकानुसार परिचारिकांची पदनिर्मिती केली जात नाही. परिचारिकांची पद भरती ३ वर्षांत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कमी प्रमाणात कंत्राटी पद्धतीवर परिचारिकांची नियुक्ती करण्याचा प्रकार शासनाकडून केला जात आहे. केंद्र शासनाच्या पाश्र्वभूमीवर परिचारिकांना वेतन देण्यात यावे, केंद्र शासनाकडून ज्या प्रमाणात भत्ते लागू केले जातात तेच भत्ते परिचारिकांना लागू करावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीएनएम अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, परिचारिकांच्या बदल्याचे धोरण ठरविण्यात यावे अशा विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
नुकत्याच मुंबई व नागपुरात झालेल्या बैठकीला असोसिएशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले, सरचिटणिस प्रभा भजन, इंदुमती थोरात, सुमन टिळेकर, वर्षां पागोटे, कमल वायकोळे, यशोधरा मून, तनुजा घोरपडे-वाटेकर, चारुलता वेळेकर व पुष्पलता बरडे उपस्थित होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 9:44 am

Web Title: nurses demands to fill vacant seats
Next Stories
1 देशाच्या विकासासाठी कोळसा अत्यंत महत्त्वाचा-गर्ग
2 रातकिडय़ांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त
3 जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
Just Now!
X