29 February 2020

News Flash

दीपावलीच्या कार्यक्रमात कोल्हापुरात मराठीची शपथ

दीपावलीच्या उत्सवाबरोबरच एक प्रतिज्ञा करू या, मी मराठी आहे, माझी जात, धर्म, व्यवहार, माय, सर्वस्व मराठी आहे, असे मत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी

| November 23, 2012 08:55 am

दीपावलीच्या उत्सवाबरोबरच एक प्रतिज्ञा करू या, मी मराठी आहे, माझी जात, धर्म, व्यवहार, माय, सर्वस्व मराठी आहे, असे मत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर आविष्कार क्रिएशन्स म्युझिकल इव्हेंट्सच्या वतीने केशवराव भोसले नाटय़गृह, कोल्हापूर येथे झालेल्या ‘माझी माय मराठी’ संगीतमय कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
‘उठी उठी गोपाळा’ भूपाळीने सुरुवात झालेल्या कार्यक्रमामध्ये गोंधळी, भारुड, कोळी नृत्य, जोगवा, लावणी, आदिवासी नृत्य या विविध लोककलेबरोबरच महाराष्ट्रातील सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा, ऐतिहासिक वारसा विविध गीत व नृत्यामधून सादर केल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगात गेला. गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील, प्रवीण मोरबाळे यांचे होते, तर भाग्यश्री चरणकर, गौरी कालेकर, सीताराम जाधव, संदीप लोहार आणि गोरक्षनाथ कालेकर यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे देवानंद कुरळे (पुणे), ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी व प्रकाश सुतार उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे, रसिकांचे आभार कार्यक्रमाचे प्रमुख गायक, निर्माता, दिग्दर्शक गोरक्षनाथ कालेकर यांनी मानले. निवेदन महेंद्र कुलकर्णी व वर्षां गाडगीळ यांचे होते.

First Published on November 23, 2012 8:55 am

Web Title: oath in marathi language
टॅग Diwali
Next Stories
1 इचलकरंजी नगरपालिका नगराध्यक्षपदी गोंदकर
2 पाच तासाची बैठक, आयुक्तांचे सादरीकरण अन् कंटाळलेले अधिकारीं
3 घोले रस्त्यावरील हॉटेलची अनधिकृत बांधकामे पाडली
X
Just Now!
X