22 October 2020

News Flash

तीन मजुरांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

तालुक्यातील माहीजळगाव येथे गुरुवारी विहिरीचे खोदकाम करीत असताना अंगावर मोठा दगड पडून तीन मजुरांचा करून अंत झाला होता. त्या मजुरांच्या मृतदेहांवर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात

| July 13, 2013 01:45 am

तालुक्यातील माहीजळगाव येथे गुरुवारी विहिरीचे खोदकाम करीत असताना अंगावर मोठा दगड पडून तीन मजुरांचा करून अंत झाला होता. त्या मजुरांच्या मृतदेहांवर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण कर्जत तालुका हळहळला.
शुक्रवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी तिन्ही मृत मजुरांच्या घरी जाऊन सांत्वन केले. पक्षाच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश तोरडमल, तालुकाध्यक्ष नानासाहेब निकत, राजेंद्र गुंड, भाऊसाहेब निंबोरे, विष्णू खेडकर आदी या वेळी उपस्थित होते. शेलार यांनी मृताच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. याबाबत त्यांनी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याशीही चर्चा केली. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:45 am

Web Title: obsequies in mournful mood on 3 labourers
Next Stories
1 ‘अधिका-यांना वठणीवर आणावे लागेल’
2 नगर शहरात दिवसभर आषाढसरी
3 सावेडी रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम
Just Now!
X