News Flash

आजाराला कंटाळून वृध्दाची आत्महत्या

वृद्धापकाळ व आजाराला कंटाळून शहरातील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी वसंतराव भास्कर आगाशे (वय-९०) यांनी आगाशे वस्ती येथील राहात्या घरी गळफास घेऊन आज आत्महत्या केली.

| February 14, 2013 02:12 am

वृद्धापकाळ व आजाराला कंटाळून शहरातील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी वसंतराव भास्कर आगाशे (वय-९०) यांनी आगाशे वस्ती येथील राहात्या घरी गळफास घेऊन आज आत्महत्या केली.  आगाशे यांनी आज सकाळी प्रवरा डाव्या कालव्याच्या कडेला असलेल्या राहात्या घरी खिडकीला नायलॉन दोरीने गळफास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांना निद्रानाश व विविध आजारांनी ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी तशी चिठ्ठी लिहून ठेवली. ‘मुलगा विनय याने चांगली सेवा केली. अनेक आजारांमुळे त्रास होतो. जीवनात कोणतीही इच्छा राहिली नाही. शेत जमिनीत कालिका मातेचे मंदिर बांधावे, आता आमचा राम राम घ्यावा,’ असे चिठ्ठीत लिहिले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 2:12 am

Web Title: old man suside
Next Stories
1 देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार- खोंडे
2 नगरला पावसाची हजेरी
3 दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन
Just Now!
X