भरधाव ओम्नी व नॅनोची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. बीडपासून जवळच असलेल्या आनंदपाडीजवळ सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
रमेश गवळी (कोळगाव, तालुका गेवराई) मित्रांसमवेत ओम्नी गाडीतून निघाले असताना समोरून येणाऱ्या नॅनोने धडक दिली.  जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.