21 September 2020

News Flash

मराठी चित्रपटात पुन्हा शंकर महादेवन यांचा आवाज!

‘मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे’, ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनि आले रंग प्रीतीचे’, ‘मोरया मोरया’ आणि ‘परवर दिगार, परवर दिगार’ या आणि अशा आणखी काही

| February 18, 2014 08:21 am

‘मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे’, ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनि आले रंग प्रीतीचे’, ‘मोरया मोरया’ आणि ‘परवर दिगार, परवर दिगार’ या आणि अशा आणखी काही गाजलेल्या गाण्यांनंतर आता प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘रंग तू..’ हे नवीन मराठी प्रेमगीत चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.
‘सौ. शशी देवधर’ या आगामी मराठी चित्रपटासाठी महादेवन यांनी पाश्र्वगायन केले आहे. या चित्रपटाचे संगीत हिंदीत अनेक वर्षे काम करणाऱ्या शर्मा बंधू यांचे आहे. संगीतकार म्हणून त्यांनी ‘टबी-परिक’ हे नाव घेतले आहे. तर गीत आशीष कुलकर्णी यांचे आहे.
महादेवन यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, टबी-परिक यांच्यासोबत मी गेली २० वर्षे काम करतोय. माझ्या ‘ब्रेथलेस’पासून आम्ही एकत्र आहोत. हे गाणे करताना खूप मजा आली. मराठीत पुन्हा गाताना एक वेगळाच आनंद मिळतो. तर संगीतकार टबी-परिक जोडीतील इंद्रजीत शर्मा ऊर्फ टबी म्हणाले की, ‘थोडे तुझे नी थोडे माझे’नंतरचा हा आमचा दुसरा मराठी चित्रपट. शंकर महादेवन आणि आमचे कौटुंबिक संबंधही आहेत. ‘रंग तू’ हे गाणे शंकर महादेवन यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे आम्ही आधीच नक्की केले होते. नायिकेवरील आपले प्रेम आता व्यक्त करू की नको, अशा पेचात पडलेल्या नायकाची मनस्थिती या गाण्यात दाखविण्यात आली आहे, अशी माहिती गीतकार आशीष कुलकर्णी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:21 am

Web Title: once again shankar mahadevan voice to marathi song
टॅग Entertainment
Next Stories
1 मुंबईत ‘४ जी’च्या टॉवर्सना पालिकेचा खो
2 त्याच समस्या, तीच आश्वासने
3 ‘लोकसत्ता यशस्वी भव’ मार्गदर्शन शिबीर
Just Now!
X