News Flash

वैद्यकीय अधिका-यास दीड वर्ष सक्तमजुरी

गरोदर महिलेशी लज्जास्पद वर्तन केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी डॉ. देवीदास लक्ष्मण मते (वय ३२, रा. अहिल्यानगरी, पाइपलाइन रस्ता, नगर) याला दीड वर्ष सक्तमजुरी व

| December 23, 2013 01:54 am

गरोदर महिलेशी लज्जास्पद वर्तन केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी डॉ. देवीदास लक्ष्मण मते (वय ३२, रा. अहिल्यानगरी, पाइपलाइन रस्ता, नगर) याला दीड वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली. दंडाच्या रकमेतील १५ हजार रुपये फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली वाघमोडे यांनी या खटल्याचा निकाल आज दिला. सरकारतर्फे सरकारी वकील अर्चना ठाकरे-शिंदे यांनी काम पाहिले. खटल्यात सरकारतर्फे ४ व आरोपीच्या वतीने २ असे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हय़ाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन व सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक निरीक्षक अशोक भालेराव यांनी केला.
तोफखाना भागात राहणारी, विडी कामगार गरोदर महिला (वय २५) सर्जेपुरा भागातील विडी कामगार रुग्णालयात, फॅसिलिटी कार्डवर वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आवश्यक असल्याने ती घेण्यासाठी २३ डिसेंबर २०११ रोजी गेली होती. ती ८ महिन्यांची गरोदर होती. तिला तपासणीची आवश्यकता नसतानाही, रुग्णालयात नियुक्त असलेले डॉ. मते यांनी तिला जबरदस्तीने केबीनमधील खुर्चीवर बसवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. नंतर महिलेने घरी परतल्यावर पतीला याविषयी माहिती दिली. त्यानंतर चार दिवसांनी तोफखाना पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. मते विरुद्ध भादंवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला व दोषारोपपत्र न्यायालयात पाठवले. डॉ. मते सध्या भिवंडी येथे नियुक्त असल्याचे समजले.
महिलेला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई अपिलाची मुदत संपल्यावर देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:54 am

Web Title: one and a half year servitude to medical officer
Next Stories
1 २३ अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई प्रस्तावित
2 बिबटय़ा जेरबंद
3 अन्नसुरक्षा योजनेसाठी लाभार्थीच्या याद्या अल्पावधीत बनविताना प्रशासनाची कसोटी
Just Now!
X