01 October 2020

News Flash

वाहन करवसुली व्यवस्थापकाकडे पाच लाखांची खंडणी मागणारा अटकेत

खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीत वाहन प्रवेशकर वसुली करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाकडे पाच लाखांची खंडणी मागणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने अधिक तपासासाठी २०

| November 20, 2012 03:07 am

खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीत वाहन प्रवेशकर वसुली करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाकडे पाच लाखांची खंडणी मागणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने अधिक तपासासाठी २० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संदीप कृष्णा खिलारे (वय २४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राकेश यशपाल बिजन (रा. खडकी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजन हे बोरेले बिल्डरकॉम या कंपनीचे व्यवस्थापक आहेत. या कंपनीच्या वतीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वाहन प्रवेशकर आकारणीचे काम चालू आहे. आरोपीने वाहन प्रवेशकर आकारताना गैरप्रकार होतो, असा तक्रार अर्ज कॅन्टोंमेन्ट बोर्डाकडे व पोलिसांकडे दिला होता. ती तक्रार मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्याचबरोबर कंपनीविरुद्ध पुन्हा तक्रार करु नये यासाठी दरमहा तीस हजार रुपयांची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी बिजन यांनी खडकी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयात दुपारी हजर केले असता २० नोव्हेंबपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2012 3:07 am

Web Title: one arrested for demanding five lakhs from vehicle taxpayment manager
टॅग Transport
Next Stories
1 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे ‘अर्थ साक्षरता अभियान’ राबवणार
2 ‘वास्तुविश्व २०१२’ प्रदर्शनास कराडमध्ये प्रारंभ
3 कथक नृत्य आणि जॅझ संगीताच्या साक्षीने उलगडणार कस्तुरबा गांधींचा जीवनपट
Just Now!
X