News Flash

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

खासगी आराम बसमध्ये धोकादायक पध्दतीने वेल्डिंगचे काम सुरू ठेवल्याने विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू होण्याची घटना येथे घडली.

| January 15, 2015 07:22 am

खासगी आराम बसमध्ये धोकादायक पध्दतीने वेल्डिंगचे काम सुरू ठेवल्याने विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू होण्याची घटना येथे घडली. निष्काळजीपणे काम करून संबंधिताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यावरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पारीख ट्रॅव्हल गॅरेज कम्पाउंड येथे ही घटना घडली. बसची काही चाके ओल्या जागेत असताना वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले. यावेळी बसमध्ये अजय खिल्लारे व शंकर सकर हे झोपलेले होते. ही बाब लक्षात आल्यावर अजय मोरे त्यांना उठविण्यास गेला. यावेळी संशयिताने वेल्डिंगचे काम सुरू ठेवले आणि ही दुर्घटना घडली, असे तक्रारीत म्हटले आहे. विजेचा धक्का बसून मोरे यांचा मृत्यू झाला. वेल्डिंग मशीन सुरू ठेवल्यास घडणाऱ्या परिस्थितीची जाणीव असताना निष्काळजीपणे यंत्र चालविल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 7:22 am

Web Title: one dead due to shock in nashik
टॅग : Nashik
Next Stories
1 नद्यांमध्ये जाणारे सांडपाणी रोखण्याची गरज
2 ऋतुरंगमुळे नाशिकरोडवासियांची एक सायंकाळ ‘नाटय़ांकित’
3 तोफांच्या प्रहारक क्षमतेचे दर्शन
Just Now!
X