गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोल येथे ेसोमवारी रात्री आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीत महिलेचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.  पिंपरी झोल येथे  मोहन राख व त्याच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीवर दगडफेक करून राम ज्ञानोबा कांबळे, उमाबाई ज्ञानोबा कांबळे आदींना काठी व लोखंडी गजाने मारहाण केली.   उमा कांबळे यांचा गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयवंत तांबारे गंगाखेडमध्ये दाखल झाले. राम कांबळे यांच्या फिर्यादीवरून मोहन राखसह ३६ जणांवर खुनाचा, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्य़ात १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मंगळवारी दुपारी गंगाखेडमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी सर्व आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली, तसेच यापुढे ३० एप्रिलपर्यंत होणाऱ्या आंबेडकर जयंती कार्यक्रमास चोख बंदोबस्त देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले मृत महिलेच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहायता निधीतून एक लाख रुपये अर्थसाह्य़ देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी मंगळवारी सांगितले.