नाटय़विषयक जाणीव अधिक प्रगल्भ करण्यासाठी अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ई-नाटय़चौपाल’ मायबोली उपक्रमाअंतर्गत एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’ येथे सुरू असलेल्या नाटय़ महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांच्या दिग्दर्शकांशी रसिकांना ऑनलाइन संवाद साधता आला.
भ्रमणध्वनी, लॅपटॉप ते घरच्या संगणकावर आणि ज्या ज्या ठिकाणी इंटरनेटची जोडणी असेल त्या ठिकाणी यू टय़ूब आणि गुगल हॅगआऊटच्या माध्यमातून रसिकांना हा कार्यक्रम थेट पाहता आला तसेच चर्चासत्रात, परिसंवादातही सहभागी होता आले. यू टय़ूबवरून हे सर्व कार्यक्रम जतन केले जाणार आहेत.
महोत्सवात सादर झालेल्या नाटकांचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विरेंद्र प्रधान यांची मुलाखत यात सादर झाली. दीपा गेहलोत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शेखन सेन, अतुल तिवारी हे ही याच प्रकारच्या अन्य कार्यक्रमात सहभागी झाले होते.