News Flash

महाऑनलाईनच्या माध्यमातून ‘वीजबिल भरणा’वर कार्यशाळा

महावितरणने महाऑनलाईन ई-सेवा केंद्र आणि एअरटेल मनीच्या माध्यमातून वीजबिल भरणा करण्याची सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

| May 21, 2014 08:23 am

महावितरणने महाऑनलाईन ई-सेवा केंद्र आणि एअरटेल मनीच्या माध्यमातून वीजबिल भरणा करण्याची सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या सेवेच्या कामकाजाचा तपशील व इतर कार्यालयीन प्रक्रिया याची सविस्तर माहिती महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावी, यासाठी नागपूर शहर परिमंडळातील प्रशिक्षण केंद्रात नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महावितरणच्या नागपूर शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता मोहन झोडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.
ग्राहकांनी वेळीच व नियमितपणे वीजबिलांचा भरणा करण्यासाठी त्यांना सहजरित्या वीजबिल भरता यावे म्हणून महावितरणने सुरू केलेल्या या सेवांचा लाभ अधिकाधिक ग्राहकांना व्हावा, यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कार्यशाळेला महावितरणच्या मुंबई येथील सांधिक कार्यालयातील लेखा अधिकारी मोहन धवणे आणि महाऑनलाईनचे राकेश ठक्कर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) श्वेता जानोरकर यांनी केले, तर आभार लेखा अधिकारी ए. एन. माटे यांनी मानले. याप्रसंगी कार्यकारी अभियंते चंद्रकांत खंडाळकर, आर.एन. गायकवाड, एम.एस. ढोबळे, ए.पी. मोहड, सुहास मैत्रे यांच्यासह परिमंडळातील उपविभागीय अभियंते, लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 8:23 am

Web Title: online electricity bill payment
टॅग : Nagpur
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती व उपाययोजनांचा आढावा
2 आता विकास योजनांना गती
3 तिकीट दरवाढ टळल्याने रेल्वेप्रवाशांना दिलासा
Just Now!
X