युवक मित्र व विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने २५ व २६ जानेवारी रोजी येथे खुल्या जलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कुरुक्षेत्र चषकासाठी होणाऱ्या या स्पर्धेसाठी ७० हजार रुपयांची बक्षिसे आहेत. विजेत्यास १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे.
युवक मित्र व विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने शास्त्रोक्त बुध्दिबळ प्रशिक्षण दिले जाते. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नामवंत खेळाडूंच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या उपक्रमाचा भाग म्हणून खुल्या जलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेचे उद्घाटन देशाचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आहेत. स्पर्धेतील खेळाडूंची योग्य ती व्यवस्था केली जाणार आहे, स्पर्धेसाठी नामांकित बुध्दिबळ पंच भरत चौगुले, सांगली येथील एम. बी. ए. बुध्दिबळ संस्थेचे दीपक वायचळ, दत्ता मोरे, लोमटे हे सहकार्य करणार आहेत, अशी माहिती बाबा इंदुलकर यांनी दिली.