News Flash

स्पर्धेत खंबीरपणे उभा राहणारा विद्यार्थी घडावा-वळसे

नागापूर एमआयडीसीमधील ग्रामीण विकास मंडळ संचलित सन फार्मा. विद्यालय व चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज सकाळी श्री. वळसे यांच्या हस्ते झाले.

| July 8, 2013 02:25 am

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांतील गुण विकसित करुन भविष्यातील स्पर्धेच्या युगात त्यांना खंबीरपणे उभे रहाता यावे, हाच खरा शिक्षणातील आमूलाग्र बदल ठरेल, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे यांनी आज येथे बोलताना केले.
नागापूर एमआयडीसीमधील ग्रामीण विकास मंडळ संचलित सन फार्मा. विद्यालय व चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज सकाळी श्री. वळसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी संस्थेस १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री मधुकर पिचड होते. यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आ. चंद्रशेखर घुले, आ. अरुण जगताप, आ. शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला पाहिजे, म्हणजे काय झाले पाहिजे, असा प्रश्न करुन श्री वळसे म्हणाले की, केवळ शाळेची इमारत बांधणे किंवा शाळेचा १०० टक्के निकाल लागणे म्हणजे संस्थेची प्रगती नव्हे. संस्था शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखली गेली तरच शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असे म्हणता येईल. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकण्यासाठी त्यांना तांत्रिक कुशलतेचे प्रशिक्षण दिले पाहिजे, त्यासाठी शिक्षकांनीही नवीन ज्ञान आत्मसात करुन मुलांच्या आवडीकडे लक्ष देण्याची गरज आहे व मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्या पालकांशीही सुसंवाद साधावा.
सध्याच्या युगात पैसा हे भांडवल नाही तर बुद्धिमत्ता हेच भांडवल आहे, त्यामुळे शिक्षण संस्थांनी गुणवत्तेचा किताब मिळवणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे, असे आवाहन पिचड यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष दादा कळमकर यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती दिली. जि.प. उपाध्यक्ष मोनिका राजळे, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अरुण कडू, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके, सुजित झावरे, संग्राम जगताप, विक्रम पाचपुते, रावसाहेब म्हस्के, शारदा लगड, शंकरराव घुले, बाळासाहेब पवार, संस्थेचे संचालक दिगंबर सप्रे, प्रकाश घुगे, सुदाम भोर, शांताराम गाडे आदी यावेळी उपस्थित होते. बबनराव कातोरे यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 2:25 am

Web Title: opening of school bld of rural deve circle by dilip valse patil
Next Stories
1 शिक्षक बँक संचालकांच्या खुच्र्याना बांगडय़ांचा आहेर देण्याचा ‘गुरुकुल’चा इशारा
2 टोल आकारणीच्या विरोधात आज मोर्चा
3 आरटीईतील २५ टक्के आरक्षण दुप्पट जागा शिल्लक असतानाही दीड हजार बालक प्रवेशापासून वंचित
Just Now!
X