मान्सूनच्या पाश्र्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. ३१ मेपूर्वी नालेसफाई व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून रस्त्यांवर नवीन खोदकाम करण्यासाठी परवानगी देणे बंद करण्यात आले आहे.
शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.      साफसफाईच्या कामामध्ये निष्काळजीपणा केला जाऊ नये यासाठी २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
महापालिका मुख्यालयामध्ये मुख्य केंद्र सुरू केले जाणार असून ऐरोली, वाशी, नेरुळ अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे.  महावितरणनेही आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना या बठकीत देण्यात आल्या आहेत.