News Flash

बंधाऱ्यावरील वीजपुरवठा एक तास सुरू करण्याचे आदेश

उन्हाची दाहकता, समोरून वाहणारी भीमा नदी. पाणी आहे, परंतु लाईट नाही अशी ग्रामीण भागाची अवस्था आहे. २३ गावांत पाण्याची कृत्रिम टंचाई ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात

| April 12, 2013 01:08 am

उन्हाची दाहकता, समोरून वाहणारी भीमा नदी. पाणी आहे, परंतु लाईट नाही अशी ग्रामीण भागाची अवस्था आहे. २३ गावांत पाण्याची कृत्रिम टंचाई ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देताच गुरसाळे बंधारा उचेठाण बढाण या बंधाऱ्यावरील वीजपुरवठा एक तास चालू करण्याचे आदेश दिले असे आमदार भारत भालके यांनी सांगितले.
गुरसाळे व उचेठाण बढाण या भीमा नदीवरील बंधाऱ्यात पंधरा दिवसांपूर्वी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्याने बंधारा काठावरच्या गावातील शेती पंपाचा वीजपुरवठा पाणी उचलू नये म्हणून वीज वितरण कंपनीने बंद ठेवला होता. त्यामुळे तेवीस गावे पाणी असून वीजपुरवठा खंडित ठेवल्याने तहानेने व्याकूळ झालेली होती.
पाण्यावाचून पाणी असून कसे हाल होतात हे आमदार भारत भालके यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची कल्पना दिली. अन् पाण्याची व विजेची परिस्थिती जाणून घेऊन चव्हाण यांनी बंधाऱ्यावरील गावाचा वीज पुरवठा एक तास चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले असल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी ही माहिती दिली. पाण्याची झालेली कृत्रिम टंचाई दूर होऊन या दोन गावांच्या लोकांच्या पाण्याची सोय झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:08 am

Web Title: order to start electricity supply for one hour above dam
टॅग : Dam
Next Stories
1 पंचगंगा-कृष्णा प्रदूषणासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश
2 फळबाग जिवंत ठेवण्यासाठी एक हजार शेततळय़ाचे प्रस्ताव
3 आगामी वर्षांत समाधानकारक पावसाचे भाकीत
Just Now!
X