13 August 2020

News Flash

महिलेचे हात-पाय बांधून रोकड व दागिने लांबविले

घरात एकटय़ा असलेल्या महिलेचे हात-पाय बांधून रोख १७ हजार रुपये, तसेच ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लांबविले. आशा गणेश पांढरे (वय ४०, राजेशनगर,

| November 7, 2013 01:51 am

घरात एकटय़ा असलेल्या महिलेचे हात-पाय बांधून रोख १७ हजार रुपये, तसेच ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लांबविले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास गारखेडा येथे ही चोरी झाली. आशा गणेश पांढरे (वय ४०, राजेशनगर, प्लॉट नं. ५१, गारखेडा, औरंगाबाद) या महिलेने फिर्याद दिली. ही महिला तिच्या राहत्या घरी एकटीच असताना २५ ते ३० वयोगटातील सात चोरटय़ांनी पहाटेच्या वेळी तिच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला व या महिलेला मारहाण केली. तसेच हात-पाय बांधून सोन्याचे मणिमंगळसूत्र, टापसे असे २० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोख १७ हजार रुपये लुटून नेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2013 1:51 am

Web Title: ornament looted by tieing womens hand legs
Next Stories
1 दोन हजारांची गुंतवणूक, पाचशे एकराला फायदा!
2 बीडमध्ये मुलींचा जन्मदर ९३०!
3 दिवाळी खरेदीवर महागाईचे सावट! प्रदीप नणंदकर, लातूर
Just Now!
X