ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आपली माणसे सत्तेत असली पाहिजेत. सत्तेचा गाडा हाकत असताना ज्यांच्या बळावर आपण निवडून आलो आहोत, त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. सामान्य माणसाचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही, असे मत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी व्यक्त केले.
उजनी (तालुका अंबाजोगाई) येथे जि. प. ग्रामीण पुरवठा विभागातर्फे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीयोजनेचे भूमिपूजन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव टाक, जि. प. सदस्या आशा दौंड आदी उपस्थित होते.
 खासदार पाटील म्हणाल्या की, ग्रामविकासाची नाळ भक्कम करण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे.
ग्रामविकासाला चालना देण्यास आपली माणसे सत्तेत असली पाहिजेत.
सत्तेचा गाडा हाकत असताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, ज्या प्रक्रियेतून किंवा ज्यांच्या बळावर आपण निवडून आलो आहोत, त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. संजय व आशा दौंड या दाम्पत्याच्या प्रयत्नातून उजनी येथे जिल्ह्य़ातील एक कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. अशा नेतृत्वाला तुम्ही जि. प.त पाठवले, याचा आनंद वाटतो. प्रास्ताविक भारत गिरी यांनी केले.