आजच्या धावपळीच्या जीवनात आयुष्याच्या उन्ह उतरणीला वृद्धांना घरातील मंडळींनी नाकारल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वृद्धाश्रमातील संख्या वाढली आहे. कुटुंबाने नाकारलेल्या या वृद्धांची सेवा आणि त्यांचा सांभाळ करणारे समाजात फार कमी लोक आहेत. वृद्धांची मने जुळवून घेऊन त्यांचा सांभाळ करण्यासाठी शांत आणि संयमी व्यक्तीमत्त्व असले पाहिजे. नागपूरच्या पंचवटी आश्रमात गेल्या अनेक वर्षांंपासून विभा प्रभाकर टिकेकर या वृद्धांची सेवा करून त्यांना आधार देत आहेत.
पंचवटी वृद्धाश्रमात ४० पुरुष आणि ३० महिला असून त्यातील अनेक चांगल्या घरातील आहेत. अनेकांची आज चांगली घरे असूनही त्यांना वृद्धाश्रमात  राहावे लागत आहे. अशा वृद्धांचा आधार म्हणून काम करताना विभाताईंना वेगळाच आनंद मिळतो. त्या अनेक वर्षांंपासून त्यांचा आधारवड झाल्या आहेत. आजोबा आणि वडील प्रभाकरराव टिककेर यांना समाजसेवेची आवड होती. तोच वारसा विभाताई चालवित आहेत. विभाताई म्हमाल्या, शालेय आणि एलएडी
आज महिला दिन
महाविद्यालयातील शिक्षणानंतर नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, सरकारी नोकरी काही मिळत नव्हती. माझ्या विवाहासाठी वडिलांनी प्रयत्न केले. मात्र, ते जमू शकले नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यात काम करायचे ठरविले. ७८ मध्ये अनसुयाबाई काळे रुग्णालयात वॉर्डन म्हणून काम केल्यानंतर काही वर्षे मातृसेवा संघ आणि त्यानंतर ९७ मध्ये पंचवटी आश्रमात काम करण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी काही दिवशी प्रायमरी शिक्षक म्हणूनही काम केले. आईवडिल आणि भावाच्या भरवशावर किती दिवस राहावे म्हणून पंचवटीत काम करायला लागली आणि त्याच ठिकाणी राहत होते. डॉ. वानकर, डॉ. लता देशमुख, डॉ. बाभुळकर यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. मातृसेवा संघाच्या व्यवस्थापन मंडळाने मला कधीच दूर ठेवले नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून पंचवटीत सेवेची संधी दिली.
वृद्धांची सेवा करण्याचा आनंद मिळत असला तरी काही वेळ वाईट वाटते. या वृद्धांवर अशी का वेळ यावी, हा प्रश्न अनेकदा मनाला कुरतडतो. अनेक वृद्धांसोबत आश्रमात राहत असून माझ्यापरीने जेवढी सेवा करायची ती करीत असते. आधीच कुटुंबापासून दूर होऊन दुखी असलेल्या वृद्धांचे मन दुखवता येत नाही. त्यामुळे खूप काळजी घेते. समाजातील अनेक जण मदतीचा हात पुढे करतात. आश्रमातील वृद्धांना मदत करीत असले तर काही वृद्धांना रक्ताच्या नात्याची मदत मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करतात. अशा वेळी त्यांची समजूत काढवी लागते. त्यांच्या दैनंदिन गरजा बघता त्यांना त्या पुरविल्या जातत. अनेक वृद्ध महिला आश्रमाच्या कामात मदत करतात. ८५-८६ मध्ये आश्रमातील कर्मचाऱ्यांनी काही मागण्यासाठी संप पुकारला. जवळपास दोन महिने तो सुरू असताना आश्रमातील वृद्धांनी प्रत्येक कामात हातभार लावला होता. स्वयंपाकापासून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वृद्धांनी कामे केली होती. वृद्धांची सेवा करण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळते. मला ते मिळाले आणि ते मी अनेक वर्षांंपासून आनंदाने करीत आहे. अनेक वृद्धांना खूप सांगायचे असते. मात्र, त्यांना आपली माणसे मिळत नाही. अशा वेळी ते माझ्याजवळ आपल्या भावना व्यक्त करतात. मला पाच भाऊ असून सर्व आपापल्या घरी आनंदात आहेत. वयाची सत्तरी उलटली. काही वेळ प्रकृती साथ देत नाही. उरलेले सर्व आयुष्य आता पंचवटी आश्रमातच घालवणार असल्याचे टिकेकर यांनी सांगितले.