25 May 2020

News Flash

दोन लाखांचा पंढरपुरी बैल आणि तीन लाखांचा मकाऊ पोपट

तीन लाख रुपये किमतीचा आफ्रिकन जातीचा मकाऊ पोपट, चॉकलेट चाखणारी अन् थम्सअप पिणारी म्हैस, किमतीच्या बाबतीत नॅनोला मागे टाकणारा दोन लाख रुपये किमतीचा पंढरपुरी बैल,

| January 28, 2014 03:15 am

तीन लाख रुपये किमतीचा आफ्रिकन जातीचा मकाऊ पोपट, चॉकलेट चाखणारी अन् थम्सअप पिणारी म्हैस, किमतीच्या बाबतीत नॅनोला मागे टाकणारा दोन लाख रुपये किमतीचा पंढरपुरी बैल, १३०० किलोचा वळू, ८० किलोचा बकरा, दिवसाला ३६ लिटर दूध देणारी गाय अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे येथे आयोजित केलेले भीमा कृषी प्रदर्शन गाजले. या प्रदर्शनात सादर केलेले २४३ प्रकारची जनावरे व १३० प्रकारचे पक्षी पाहण्यासाठी रिघ लागली होती.
दरवर्षी भरणारे भीमा कृषी प्रदर्शन वेगवेगळ्या वैशिष्टय़ांमुळे लक्षवेधी ठरत असते. हिच परंपरा यंदाच्या प्रदर्शनातही जपली गेली आहे. प्रदर्शनस्थळी बळीराजाची गर्दी वाढू लागली आहे. सामान्य नागरिकांनाही हे प्रदर्शन आकर्षित करीत आहे. प्रदर्शनामध्ये देशातील पक्षी-जनावरांच्या बरोबरीने विदेशातील जित्रापांचा समावेश आहे. पशू-पक्ष्यांच्या बरोबरीने आधुनिक शेती अवजारेही लक्ष वेधून घेत आहेत. फुले, फळांची झाडे निसर्गप्रेमींना आकर्षित करीत होते. १० ते ३० रुपये अशा किमतीत गुलाब व अन्य फुलांची रोपटी येथे विक्रीस आहेत. रक्तातील साखर कमी करणारे इन्सिलुनाचे रोप पन्नास रुपयास मिळत होते. चिनी कोंबडय़ा, आफ्रिकन जातीचा पोपट, पंचवीस हजार रुपये किमतीचे पर्शियन मांजर यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. पारंपरिक हलगी वाद्याच्या तालावर नृत्य करणारा बैल व घोडा पाहताना उपस्थितही हरवून जात आहेत. लांबलचक शिंगाच्या पंढरपुरी म्हशीचे तांडेच्या तांडे प्रदर्शनाची शोभा वाढवित होते. मुरा जातीच्या तीन वर्षांच्या वळूचे वजन तब्बल १३०० किलोचे आहे. या प्रदर्शनातील पशुपक्षी, अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे प्रेरणा मिळाली असल्याची प्रतिक्रिया उपलब्ध होत आहेत, असे मत संयोजक धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2014 3:15 am

Web Title: pandharpur bulls two lakh and macau parrot for three lakh
Next Stories
1 ‘मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे’
2 ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनाला दोन तास विलंब
3 दस्तऐवज लवकरच संगणकीकृत- थोरात
Just Now!
X