पंढरपूर आगारातून सुटणाऱ्या सुमारे शंभर एस.टी. बसेसनी खासगी पेट्रोल पंपावरून एसटीमधून डिझेल भरण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पंढरपूर एस.टी. आगाराची दररोज ८४ हजार रुपयांची बचत होत आहे असे आगारप्रमुख हरिभाऊ साळुंखे यांनी सांगितले.
पंढरपूर एस.टी. आगारातून २६० लिटरची टाकी असलेल्या ५९ एस.टी. बसेस १६० लिटरची टाकी असलेल्या ३० बसेस तर ६५ लिटरच्या टाक्या असलेल्या ८ मिनी बसेस अशा दररोज ९२ एस.टी.बसेस धावतात.
एस.टी. यापूर्वी ६२ रु. ६३ पैसे दराने डिझेल घेत होती. दिवसेंदिवस भाव वाढल्यामुळे एस.टी. हैराण झाली होती. खासगी पेट्रोल पंपावरून डिझेल हे ५२ रु.३० पैसे लिटर असून एस.टी.ला दररोज यामुळे ८४ हजार रुपयांची बचत होत आहे.
लिंक रोडवरील व्यंकटेश्वरा पेट्रोल पंपावरून पुणे, मुंबई, सातारा आदी बसेस डिझेल भरून जात असून यावर देखरेख करण्यासाठी दोन पाळ्यातून इंधन बचत अधिकारी नेमले आहेत, असे साळुंखे यांनी सांगितले.