केरळ, गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दोन हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी जनता दलाच्या वतीने कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. आघाडी शासन शेतकऱ्यांची थट्टा करीत असून जनता दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेन्शन मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी मिरजेत झालेल्या जाहीर सभेत केला.
प्रा. पाटील म्हणाले मुख्यमंत्र्यांनी चच्रेवेळी निधी किती लागेल, किती शेतकऱ्यांना लाभ द्यावा लागेल याचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेची सांगता नागपूरमध्ये शेतकर्याच्या भव्य मोर्चाने करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. या वेळी कोल्हापूर येथील  जनता दलाचे सरचिटणीस जावेद मोमीन, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष एॅड. के.डी. िशदे, कोल्हापूर अध्यक्ष अरुण सोनाळकर, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष सुरेंद्र वाजपेयी आदी उपस्थित होते.