संजय घोडावत शिक्षण समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या बिझनेस मॅनेजमेंट-नवी क्षितिजे या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत येथील केआयटी अभियांत्रिकी पदव्युत्तर विभागातील संशोधक विद्यार्थी शमुवेल पंडित यांनी सादर केलेल्या शोधनिबंधास प्रथम क्रमांक मिळाला. या परिषदेत ५२ संशोधकांनी शोधनिबंध सादर केले होते. उत्पादन क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून या प्रक्रियेत सुसूत्रता कशी आणता येईल व या माध्यमातून उत्पादकता कशी वाढवता येईल, यावर पंडित यांनी शोधनिबंध लिहिला होता. त्यांना केआयटीचे प्रा.गिरीश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. उद्योगपती संजय घोडावत, विनायक भोसले, डॉ. कर्जीनी व डॉ. सलातीयांच्या हस्ते करंडक व सन्मानचिन्ह देऊन पंडित यांचा गौरव करण्यात आला.