भारतीय स्टेट बँकेचा सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग राहिला आहे. बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त औद्योगिक वित्त शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मिशनरीज ऑफ चॅरिटी मदर टेरेसा या आश्रमातील निराधार,अपंग, मतिमंद व्यक्तींना औषधी, कपडे, अन्नधान्य व फळांचे वाटप करण्यात आल्याचे बँकेचे उपमहाप्रबंधक बिजेंद्रकुमार यांनी सांगितले.
बँकेचे ग्राहक हरिवदरसिंग िबद्रा यांच्या सहकार्याने आश्रमात सुमारे १८० मीटर लांबीचा पक्का रस्ता तयार करण्यात आला. त्याचे उदघाटन या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहायक महाप्रबंधक धरणीधर त्रिपाठी, उपमहाप्रबंधक व्ही. रामिलग यांनीही मनोगत व्यक्त केले. सूरज यामयार, उमेश डाखे यांची उपस्थिती होती. ग. भा. िपजरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जोस जोसेफ, निलिनी सूर्यवंशी, सीमा अंबेकर, कमलाकर पाठक, प्रमोद अत्रे, स्नेहल पाटील, विशाखा दीक्षित, हेमलता कांबळे, वैशाली राजपूत, सोनाली कटारे, मनोज यन्नावार, रविकांत जाधव, महेश चंद्रात्रे यांनी प्रयत्न केले.