02 December 2020

News Flash

महिलांना संरक्षण देण्यासाठी डोंबिवलीत युवा सेनेची गस्त

डोंबिवली शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पाश्र्वभूमिवर त्यांना संरक्षण देण्यासाठी शहरातील युवासेनेच्या वतीने शहरातील महाविद्यालये तसेच तरुणांचा अधिक वावर असलेल्या ठिकाणांवर गस्ते ठेवली जात आहे.

| December 21, 2012 11:49 am

डोंबिवली शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पाश्र्वभूमिवर त्यांना संरक्षण देण्यासाठी शहरातील युवासेनेच्या वतीने शहरातील महाविद्यालये तसेच तरुणांचा अधिक वावर असलेल्या ठिकाणांवर गस्ते ठेवली जात आहे.
या गस्तीबाबत शहरातील प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्याना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. महाविद्यालयाच्या आवारात प्रत्येक विद्यार्थ्यांला ओळखपत्र सक्तीचे करावे, ओळखपत्राशिवाय महाविद्यालयात कोणाही विद्यार्थ्यांला प्रवेश देऊ नये. तसेच बाहेरची व्यक्ती महाविद्यालयात सक्तीने प्रवेश करत असल्यास त्वरित गस्तीवरील पोलीस किंवा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन युवासेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे. युवा सेनेचे कार्यकर्ते सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळांमध्ये गटागटाने गस्त घालत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2012 11:49 am

Web Title: patroling of yuvasena for ladies proction
टॅग Ladies,Outrage
Next Stories
1 महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी डोंबिवलीत जनजागृती
2 ठाकुर्लीतील झोपडीवासीयांचे पालिकेसमोर उपोषण
3 कोसळलेल्या वालधुनी पुलाची शासकीय अभियंत्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन
Just Now!
X