‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकार झाली असून फिरत्या लोक न्यायालयात तिसऱ्या दिवशी १२७९ प्रकरणांचा निपटारा झाला. या न्यायालयात बुधवारी ७७१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. एका वृद्ध महिला फिर्यादीस २४ वर्षे जुन्या प्रकरणात तडजोड करून न्याय मिळाला. यशोदरा नगरातील झोपडपट्टीत फिरत्या लोक न्यायालयाने एका गर्भवती महिलेचा वाद सामंजस्याने संपुष्टात आणला.
ज्येष्ठ नागरिक बळीराम दुबे यांचे फौजदारी प्रकरण कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत २० वर्षे जुने प्रकरण प्रलंबित होते. हे प्रकरणही फिरत्या लोक न्यायालयात सामंजस्याने निकालात निघाले. पक्षकार दुबे (८०) वृद्ध असल्याने न्यायालयात जाऊ शकत नव्हते. त्यांनासुद्धा या न्यायालयाचा फायदा झाला.
फिरत्या लोक न्यायालयाच्या पॅनलमध्ये निवृत्त न्यायाधीश डब्ल्यू.व्ही. गुघाणे, अॅड. नामदेव गव्हाळे व अॅड. राजेंद्र राठी यांचा समावेश होता. न्यायदंडाधिकारी एन.एच. जाधव, अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. छायादेवी यादव, विधि शाखेचे विद्यार्थी, विधि स्वयंसेवक दरक यांच्या लोक न्यायालयाच्या चमूत समावेश होता. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली विधि साक्षरतेच्या चमूने मार्गदर्शन केले. या चमूने यशोदरा पोलीस ठाण्याला भेट देऊन घरी असलेल्यांना विधि सहाय्य पुरविले आणि शाळेला भेट देऊन कायद्याची माहिती दिली. बऱ्याच लोकांना फिरत्या लोक न्यायालयाचा चांगला अनुभव आला. एक दाखलपूर्व दावासुद्धा संपुष्टात आला. अंबाझरी व वाडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण