26 September 2020

News Flash

पनवेलकरांची स्वच्छतेसाठी एक धाव

भारत स्वच्छ अभियानाच्या एकता दौडला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी निशाणाचा झेंडा फडकविल्यानंतर पनवेलची एकता दौड सुरू झाली.

| November 1, 2014 01:01 am

भारत स्वच्छ अभियानाच्या एकता दौडला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी निशाणाचा झेंडा फडकविल्यानंतर पनवेलची एकता दौड सुरू झाली. नगर परिषदेच्या मैदानात स्वच्छतेचा सामूहिक शपथ ग्रहण करण्याचा कार्यक्रम त्यानंतर नगर परिषद इमारतीसमोरील मार्गावरून एकता दौड आरंभ झाली. दिवाळीच्या विद्यालयांना सुटय़ा असल्याने या दौडमध्ये मुलांनी अल्प प्रमाणात सहभाग नोंदवला होता. स्वच्छतेच्या दौडमध्ये कमी तरुणांचा सहभाग असल्याने किमान कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे पुरुष गटातून दौडमध्ये सामील झाले. आमदार ठाकुरांसह पनवेलकर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी धावले.
पनवेलच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये ३०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. नगर परिषद, सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी दल आणि पनवेलच्या महिला व पुरुषांनी या अभियानामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या सरकारी सोहळ्यात विविध प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशिला घरत यांनी स्वच्छता राखण्याची सामूहिक शपथ दिली.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:01 am

Web Title: people of panvel run for clean india campaign
Next Stories
1 खारघर टोल सुरू होत असल्याच्या अफवेने खळबळ
2 पनवेल एसटी स्थानक की समस्यांचे आगार
3 शेकडो मच्छीमार बोटींनी नांगर टाकला
Just Now!
X