22 September 2020

News Flash

फडणवीस यांची हजारे यांच्याशी भेट

राज्य सरकार कोडगे असल्यानेच सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करण्यास उदासीन असल्याचे सांगत प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदे होण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार

| January 18, 2014 03:00 am

राज्य सरकार कोडगे असल्यानेच सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करण्यास उदासीन असल्याचे सांगत प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदे होण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन विविध कायद्यांसंदर्भात चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. राम शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, जिल्हा खजिनदार सचिन पारखी या वेळी उपस्थित होते. फडणवीस व हजारे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, देशात लोकपाल विधेयक मंजूर झाले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा मंजूर झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल. भाजपशासित राज्यांमध्ये लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकार कोडगे असल्याने जनहिताचे कायदे करण्यास ते उदासीन आहे. राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी आपण सरकारला स्वतंत्र विधेयक सादर केले आहे. मात्र यावर कोणताही निर्णय झाला नाही. याविषयी हजारे यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
सरकारकडून मिळणारी सेवा किती दिवसांत मिळणार व न मिळाल्यास काय कारवाई होणार याविषयीचा सेवा हमी कायदा होणे गरजेचे असल्याचे सांगत फडणवीस यांनी महायुतीचे सरकार आल्यास राज्यातील सर्व टोल बंद करू असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2014 3:00 am

Web Title: phadanvis visits anna hazare
टॅग Anna Hazare
Next Stories
1 जिल्हय़ासाठी २६३ कोटींचे अंदाजपत्रक
2 नगरसेविका भोसले यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान
3 जि. प. यंत्रणेवर आमदारांचा संताप
Just Now!
X