महारोगी सेवा समिती वरोरातर्फे लोकबिरादरी प्रकल्पातील जिवंत क्षणांचे उलगडा करणारे छायाचित्र प्रदर्शन २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील आनंद बालभवनमध्ये आयोजित केले आहे. सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात लोकबिरादरी प्रकल्पातील थरारक जिवंत अनुभव छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. बांबूंच्या साहाय्याने तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. प्रकल्पातील सर्वोपचारी दवाखान्याची वास्तू मोडकळीस आली आहे. या वास्तूच्या डागडुजीसाठी पाच कोटी रुपये निधीची लोकबिरादरी प्रकल्पाला गरज आहे. या वास्तूला हातभार लावण्यासाठी डोंबिवली परिसरातून निधी उभा करावा म्हणून सुनंदा हॉलीडेजच्या शोभना साठे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा गावात चाळीस वर्षे राबून उभा केलेला लोकबिरादरी प्रकल्प १४० छायाचित्रे, हस्तद्योगाच्या माध्यमातून नागरिकांना डोंबिवलीत या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे.