06 March 2021

News Flash

पीएमपी कामगारांना सहा हजार रुपये मंजूर

महापालिका सेवकांप्रमाणे पीएमपीच्या कामगारांनाही पाच ऐवजी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला. पाच हजार सहाशे कामगारांना या निर्णयाचा लाभ

| November 13, 2012 03:20 am

महापालिका सेवकांप्रमाणे पीएमपीच्या कामगारांनाही पाच ऐवजी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला. पाच हजार सहाशे कामगारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी ही माहिती दिली. पीएमपी कामगारांनी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र, पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, असा निर्णय स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात घेतला होता. तरीही कामगारांच्या मागणीनुसार सहा हजार रुपये देण्याबाबत स्थायी समितीत सोमवारी पुन्हा चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार सहा हजार रुपये देण्याचा निर्णय समितीने एकमताने घेतला.
पीएमपीच्या नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच रोजंदारीवरील कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बक्षिशी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. ती मागणी देखील स्थायी समितीने मान्य केली असली, तरी त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अंतिम निर्णय झाला नव्हता. महापौर वैशाली बनकर, आयुक्त महेश पाठक तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यासाठी सोमवारी बैठका सुरू होत्या. या रकमेला मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार २०५ रोजंदारीवरील कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. या कामगारांना बक्षिशी म्हणून जी रक्कम द्यावी लागणार आहे त्यातील ७५ लाख रुपये पुणे महापालिका, तर ५० लाख रुपये पिंपरी महापालिका देणार आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 3:20 am

Web Title: pmp workers now gets six thousand rupees
टॅग : Pmp,Standing Committee
Next Stories
1 फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा संकल्प!
2 वैकुंठातही उजळली ज्योतसे ज्योत..!
3 सुविधा निर्माण होत आहेत; पण गुणवत्तापूर्ण शिक्षण अजून दूरच
Just Now!
X