25 September 2020

News Flash

कोवळ्या चाऱ्याची १७ जनावरांना विषबाधा

तालुक्यातील बर्गेवाडी येथे कोवळा चारा खाल्ल्याने १७ जनावरांना विषबाधा झाली. दुष्काळात जनावरांना जगवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मिळेल तो चारा जनावरांना खाऊ घालावा

| December 19, 2012 05:00 am

तालुक्यातील बर्गेवाडी येथे कोवळा चारा खाल्ल्याने १७ जनावरांना विषबाधा झाली. दुष्काळात जनावरांना जगवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मिळेल तो चारा जनावरांना खाऊ घालावा लागत आहे.
आज ही घटना घडली. बर्गेवाडी येथील दादासाहेब पिसाळ यांनी शेतातील कोवळया ज्वारीचे बाटूक त्यांच्या १७ जनावरांना घातल्याने त्यांना विषबाधा झाली. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्याने डॉ. नांदे, डॉ. सुभाष साळुंके, दादा बरबडे व रामदास नेटके यांनी जनावरांवर उपचार सुरू केले आहेत.
तालुक्यात दूध व्यवसायामुळे इतर तालुक्यांपेक्षा जनावरांची संख्या जास्त आहे. मात्र, प्रशासनाने छावण्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळेच जनावरे जगवणे मुश्किल झाले आहे. मिळेल तो चारा आणून जनावरे जगवले जात आहेत. त्याचाच त्रास जनावरांना होत आहे. केवळ ऊस खाल्ल्यानेही जनावरांना तोंडाचे आजार झाले आहेत.
विषबाधेच्या प्रकाराबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास पिसाळ यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या दुष्काळातील काम करण्याच्या पध्दतीवर नाराजी व्यक्त केली. दुष्काळात अधिकारी माणसे व जनावरांना वाचवण्याऐवजी फक्त स्वत:लाच वाचवण्याचा विचार करीत आहेत, त्यासाठी त्यांना हवा तसा निर्णय घेण्यात येतो, अशी टीका त्यांनी केली.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 5:00 am

Web Title: poision to 17 animal of baby fodder
Next Stories
1 आडत्यांचा वाद न्यायालयात
2 श्वसनाशी संबंधित अ‍ॅलर्जीच्या प्रमाणात वाढ
3 ‘त्या’ पुरवठाधारकास वाचवण्याचा प्रयत्न अंगाशी
Just Now!
X