महाराष्ट्र केसरी संजय पाटील खूनप्रकरणात काल बुधवारी सातारच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एन. के. मोरे यांनी जामीनअर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. उदयसिंह पाटील यांना आज गुरुवारी सकाळी कराड न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. शेख यांच्यासमोर हजर करण्यात आले. या वेळी फिर्यादी सरकार पक्षातर्फे या खूनप्रकरणाच्या सखोल तपासासाठी उदयसिंह पाटील यांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावर बचाव पक्षातर्फेही युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्या. शेख यांनी उदयसिंह पाटील यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अॅड. उदयसिंह पाटील कराड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र असल्याने सर्वत्र एकच खळबळ माजून आहे. दरम्यान, अॅड. उदयसिंह पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालय परिसरानजीकचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. न्यायालय परिसराबाहेर उंडाळकर समर्थकांनी गर्दी केली होती. पहिलवान संजय पाटील खूनप्रकरणाचा सध्या जादा तपास अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे करीत आहेत.
न्या. जे. ए. शेख यांच्यासमोर उदयसिंह पाटील यांना हजर करण्यात आले असता, सरकार पक्षातर्फे अॅड. राजेश मडके यांनी युक्तिवाद केला. त्यात संजय पाटील यांच्या खुनासाठी उदयसिंह पाटील यांनी दिलेल्या सुपारीची रक्कम कोणत्या बँक खात्यातून काढून दिली. सागर परमार याने खरेदी केलेल्या चार पिस्तुलांसाठी संशयितांनी किती रुपये दिले. पहिलवान पाटील यांच्या खुनाचा रचलेला कट कोणाच्या सांगण्यावरून केला. त्यात आणखी कोणी सहभागी आहे का, या अनुषंगाने तपास होण्यासाठी उदयसिंह पाटील यांना पोलीस कोठडी मिळणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद अॅड. मडके यांनी केला.
बचाव पक्षातर्फे अॅड. टी. एन. मणेर यांनी युक्तिवाद केला. त्यात सरकार पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या मुद्यांसंदर्भात तपास झाल्याचे त्यांनी नमूद केले. पिस्तूल खरेदी, मोबाईल हँडसेट याचाही तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा कोणताही तपास शिल्लक राहिलेला नसल्याने उदयसिंह पाटील यांना व्यक्तिगत हजेरीची आवश्यकता नसून, न्यायालयीन कोठडी द्यावी असा युक्तिवाद अॅड. मणेर यांनी केला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या. जे. ए. शेख यांनी उदयसिंह पाटील यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…