News Flash

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात बदलाने पोलीस, प्रशासनाची धावपळ

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २८ एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा व प्रशासन कामाला लागले आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यात

| April 26, 2013 03:45 am

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २८ एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा व प्रशासन कामाला लागले आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रथमच नागपुरात येत आहेत. सुरुवातीला त्यांचा २९ एप्रिलचा दौरा होता, मात्र नंतर यात बदल झाला असून सुधारित दौऱ्यानुसार ते रविवारी, २८ एप्रिलला सायंकाळी नागपुरात येणार असून त्यांचा रात्रीचा मुक्काम राजभवनात राहणार आहे. सोमवारी, २९ एप्रिलला सायंकाळी एनएडीटीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याच दिवशी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.
त्यादृष्टीने मंगळवारी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त के.एल. प्रसाद यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. राष्ट्रपतीच्या आवा-गमनाच्या मार्गावर वाहन ताफ्याचा सराव करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींचा दौरा असल्याने पोलीस व प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 3:45 am

Web Title: police department hustle because of change in president tour
Next Stories
1 एलबीटीची झळ जाणवू लागली;चिल्लर विक्रेत्यांना मालाची चणचण
2 पेंचमधील गरीब आदिवासींच्या ‘गोंडी नृत्याला लाखाचे मोल!
3 ऊस कापणी मजुरांच्या टोळीकडून शेतकऱ्यांची लूट!
Just Now!
X