शहरात विनापरवाना वाहन चालविणे, सुसाट वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे या कारणांवरून पोलिसांनी कळवण- नाशिक रस्त्यावर ५१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सहा हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी दिली.
शहर व परिसरात काही दिवसांमध्ये वाढलेल्या चोऱ्या व सोनसाखळी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कळवण पोलिसांनी वाहनांची तपासणी मोहीम सुरू
केली.
या तपासणीमध्ये अल्पवयीन दुचाकी चालक, तसेच अतिवेगात वाहन चालविणारे, गाडीचा परवाना नसणारे, वाहनांवर नंबर नसणारे, दुचाकीवरून तिघे जाणारे, वाहन चालविण्याचा परवाना नसणारे, वाहनाची कागदपत्रे सोबत नसणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. एकाच दिवसात २५० दुचाकींची तपासणी करण्यात आली.