शिवनगर (रेठरे बुद्रुक) येथील कृषी महाविद्यालयात नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या २० लाख रुपये किमतीच्या चोरीचा छडा मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी लावला. या प्रकरणी संतोष दिलीप बनसोडे(वय २५ रा.रेठरे कारखाना, कराड), विक्रम बापुसाहेब कांबळे (वय २०, सध्या रा.चंबुखडी, कोल्हापूर, मूळ किल्ले मच्छिंद्रगड, ता.वाळवा) आणि जग्गू ऊर्फ जगन्नाथ भिकाजी तळेकर (वय २८, रा.रंकाळा टॉवर,कोल्हापूर) या तिघांना अटक केली आहे. चोरटय़ांनी नऊ महिन्यांपूर्वी चोरी केल्यानंतर मौजमजा करण्यास सुरुवात केली. त्यातून ५ लाख रुपये किमतीचे स्कॉर्पिओ (एम.एच.०९-डी.वाय.३३३३) ही खरेदी केली. तिघेही संशयित रीत्या वावरत असताना त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी पकडले. त्यांनी कृषी महाविद्यालयातील चोरीची कबुली दिली. चोरटय़ांकडून ५ लाख रुपये किमतीचे स्कॉर्पिओ व रोख ३० असा साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी शहरात घरफोडी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 1:57 am