News Flash

विठ्ठलवाडी जकात नाक्यात राजकीय घुसखोरी!

विठ्ठलवाडी पूर्व भागातील रिकाम्या पडलेल्या जकात नाक्याच्या टपरीत रेल्वे तिकीट कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

| January 9, 2014 07:25 am

विठ्ठलवाडी पूर्व भागातील रिकाम्या पडलेल्या जकात नाक्याच्या टपरीत रेल्वे तिकीट कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या टपरीच्या माध्यमातून स्वत:चा महसूल वाढविण्याचा विचार कल्याण डोंबिवली पालिकेतील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा नातेवाईक करीत असल्याचे पालिकेतील चर्चेतून समजते. पालिकेची जकात गेल्या वर्षांपासून बंद झाली. त्यानंतर विठ्ठलवाडी पूर्व भागाजवळील जकातीची टपरी तेथून हलविणे आवश्यक होते. या रिकाम्या टपरीत वर्षभर भिकारी, गर्दुल्ल्यांचा राबता होता. या टपरीतील घुसखोरांना पालिकेतील राजकीय व्यक्तीने आपल्या अधिकाराचा वापर करून बाहेर काढले. आता रिकाम्या असलेल्या या टपरीवर रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयाचा फलक लावून टपरीच्या जागेवर आपला हक्क दाखविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेतील एका पदाधिकाऱ्याच्या नातेवाइकाने हे उद्योग चालविले आहेत असे या भागातील रहिवाशांकडून सांगण्यात येते.
जकातीची टपरी व तिच्या परिसरातील जागाही पोलिसांच्या निवासी वस्तीसाठी आरक्षित आहे. या जागेवर अनधिकृत बांधकामे उभी आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी पालिका प्रशासन टपरीसह लगतच्या बांधकामांचे संरक्षण करीत असल्याबद्दल पोलिसांसह रहिवाशांकडून नाराजीचा सूर काढला जात आहे.
जकात टपरीवर रेल्वे तिकीट कार्यालयाचा फलक लागताच ही जागा राजकीय भूमाफियांच्या पोटात जाईल या भीतीने पोलिसांनी टपरीसह लगतच्या भूखंडावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी या मागणीसाठी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 7:25 am

Web Title: political infiltration in vitthalwadi octroi post
Next Stories
1 अडचणीतील ठेकेदाराला सुगीचे दिवस
2 पहाट आणि सायंकालीन संगीत मैफलींची मांदियाळी
3 काळा तलाव महोत्सवाचे पाचवे पर्व
Just Now!
X