29 May 2020

News Flash

कल्याणमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा

कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केट परिसरात एक फुटलेल्या जलवाहिनीला मलवाहिनी येऊन मिळाल्याने या परिसराला गेल्या आठवडाभरापासून मलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे.

| May 16, 2013 12:04 pm

कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केट परिसरात एक फुटलेल्या जलवाहिनीला मलवाहिनी येऊन मिळाल्याने या परिसराला गेल्या आठवडाभरापासून मलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने पाणी पिणे अशक्य झाले आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
झुंझारराव मार्केटजवळील साई मंदिराजवळ ही जलवाहिनी फुटली आहे. तेथून गेलेल्या मलवाहिनीचे मल जलवाहिनीतून वाहत असल्याने हे मलमिश्रित पाणी परिसरात घराघरात पोहचत आहे. याविषयी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात तक्रारी करूनही तुमची समस्या दोन दिवसात सोडवली जाईल, अशी उत्तरे गेल्या सात दिवसापासून नागरिकांना देण्यात येत आहेत. या भागात हॉटेल्स, व्यापारी बाजारपेठा आहेत. पालिकेचा पाणीपुरवठा शहराच्या १४ लाख लोकसंख्येच्या जिवाशी खेळत असल्याने करदात्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2013 12:04 pm

Web Title: polluted water supply in kalyan
टॅग Pollution
Next Stories
1 उल्हास नदीत युवकाची आत्महत्या
2 सिद्धेश्वर तलावास अनधिकृत बांधकामांचा विळखा
3 कोपरीत स्थानिक गुंडांच्या वादातून वाहनांची तोडफोड
Just Now!
X