शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आत्माराम पाटील शाहिरी मंचाच्या वतीने राज्यस्तरीय युवा शाहिरांसाठी आयोजित पोवाडे व गीतगायन स्पर्धेत ३४ संघांनी भाग घेतला. विजेत्या संघांना माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी खासदार उत्तमसिंह पवार, नम्रता भिंगार्डे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : शाहीर सुरेश तुकाराम सूर्यवंशी (पुणे), रोख १० हजार, स्मृतिचिन्ह, शाहिरी फेटा व सन्मानपत्र. शाहीर अनिता खरात (तासगाव, जिल्हा सांगली), रोख ७ हजार, स्मृतिचिन्ह, शाहिरी फेटा व सन्मानपत्र. शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते (बुधगाव, जिल्हा सांगली), रोख ५ हजार, स्मृतिचिन्ह, शाहिरी फेटा व सन्मानपत्र. उत्तेजनार्थ- शाहीर रामानंद उगले (जालना) व शाहीर श्रद्धा निकम (बुधगाव, सांगली)- रोख एक हजार व सन्मानपत्र, सवरेत्कृष्ट ढोलकीपटू- तानाजी तोडकर (मिरज, सांगली), रोख एक हजार व सन्मानपत्र. सवरेत्कृष्ट झिलकारी- सुरेश निकम (बुधगाव, सांगली), रोख एक हजार व सन्मानपत्र. स्पर्धेचे संयोजक शाहीर अंबादास तावरे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. जयंत शेवतेकर, शाहीर दीनानाथ साठे आणि गुलाबराव महाराज पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.