महावितरणच्या गैरकारभार व दुर्लक्षामुळे उरण तालुक्यातील मुळेखंड, कोळीवाडा परिसरात पाच दिवसांपासून विद्युतपुरवठा नसल्याने येथील नागरिकांचे हाल सुरू आहेत. सोमवारी मुळेखंड, कोळीवाडामधील ग्रामस्थांना थेट उरण महावितरणच्या उपअभियंता कार्यालयावर धडक देत हल्लाबोल केला. या वेळी गावातील महिलांनी महावितरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  बुधवारी आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे उरण तालुक्यातील मुळेखंड, कोळीवाडा गावांतील महावितरणने टाकलेले विजेचे खांब कोसळल्याने वीज गेलेली आहे. त्रस्त झालेल्या महिलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना या वेळी जाब विचारला.या संदर्भात उरण महावितरणचे सहायक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता विजेचे खांब उभे करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून काम होत नसल्याने खांब उभे करण्यास उशीर होत आहे. मंगळवापर्यंत मुळेखंड येथील खांब उभे करून वीज पूर्ववत सुरू करू, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.