08 March 2021

News Flash

थकबाकीमुळे कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झालेल्यांना दिलासा

थकबाकीमुळे शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आलेला कृषीपंपांचा वीजपुरवठा काही रक्कम

| September 11, 2013 09:31 am

थकबाकीमुळे शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आलेला कृषीपंपांचा वीजपुरवठा काही रक्कम भरून तात्काळ सुरू करण्यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि आ. प्रा. शरद पाटील यांच्यात झालेल्या चर्चेत निर्णय घेण्यात आला. तीन अश्वशक्तींसाठी दोन हजार तर पाच अश्वशक्तीच्या पंपासाठी चार हजार रुपये भरल्यास बंद पडलेली जनित्रे तात्काळ सुरू करण्याविषयी शाखा अभियंता व उपकेंद्रांना आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्य़ासह राज्यातील कृषीपंपांची आठ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यामुळे आ. पाटील यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. कृषीपंप सुरू करण्यासाठी शेतकरी व वितरण कंपनी यांच्यात मध्यम मार्ग काढण्यात आला. तीन अश्वशक्तीचे कृषीपंप असलेल्यांनी तात्काळ प्रत्येकी दोन हजार रुपये आणि पाच अश्वशक्तीचे कृषीपंप असलेल्यांनी चार हजार रुपये जोडणी सुरू करण्यासाठी भरावेत. तसेच एप्रिल २०१२ नंतरच्या देयकांची उर्वरित रक् कम ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सलग तीन समान हप्त्यांत भरण्यासाठी संधी द्यावी, असा निर्णय घेण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळाने मार्च १२ पूर्वीच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी सक्ती करू नये असे बैठकीत जाहीर केलेले असल्याने अधिक थकबाकी असलेल्यांना दिलासा मिळाला आहे. देयकांच्या वसुलीबाबत धोरणात्मक निर्णय नंतर जाहीर होणार आहे.ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांत शेतकऱ्यांना उर्वरित दोन हजार पाचशे ३८ रुपये व चार हजार ९५० रुपये अनुक्रमे तीन व पाच अश्वशक्तीसाठी भरल्यानंतर मार्चपर्यंत दिलासा मिळणार आहे. देयक भरल्यानंतरही काही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 9:31 am

Web Title: power cut of agri water pump gets relaxation
Next Stories
1 ‘स्त्रियांमधील अस्मिता जागृतीची गरज’
2 शहर स्वच्छता अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
3 एखाद्याच चंद्राला कळते काळजातील ओल..
Just Now!
X