07 April 2020

News Flash

सातबारा : नवी मुंबई महापालिका निवडणूक

माजी महापौर मनीषा भोईर, माजी महापारै अंजनी भोईर यांचे पती प्रभाकर भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता विजयानंद माने, भाजपचे युवा नेते वैभव

| April 15, 2015 07:24 am

माजी महापौर मनीषा भोईर, माजी महापारै अंजनी भोईर यांचे पती प्रभाकर भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता विजयानंद माने, भाजपचे युवा नेते वैभव नाईक व त्यांची बहीण वैशाली नाईक या नणंद-भावजयांची झुंज, गणेश नाईक यांच्या गावातून बोनकोडे येथून पहिल्यांदाच उभा राहिलेला नाईकव्यतिरिक्त उमेदवार आणि सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे आणि काँग्रेसचे अविनाश लाड यांची लढत या वीस मतदारसंघांत दिसून येणार आहे. माने यांच्या समोर राष्ट्रवादीचे किसन मोरे हे उभे असून पावण्यात माजी महापौर मनीषा भोईर यांची लढत ऐन उमेदवारी वाटपाच्या दिवशी शिवसेनेत उडी मारलेले विलास मुकादम यांची पत्नी सपना यांच्याशी होणार आहे. हरिभाऊ म्हात्रे यांचा सामना राष्ट्रवादीच्या लीलाधर पाटील यांच्याबरोबर आहे. प्रभाग क्रमांक ५१ मधील लढतीकडे सर्व नवी मुंबईचे लक्ष लागून आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे सख्खे पुतणे वैभव नाईक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काकांना सोडचिठ्ठी देऊन प्रथम सेनेत आणि विधानसभा उमेदवारी न मिळाल्याने नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव नाईक यांची पत्नी वैष्णवी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यांच्यासमोर त्यांची नणंद व वैशाली नाईक या वडिलांचे नाव घेऊन मैदानात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उतरल्या आहेत. लोहा लोहे को काटता है या उक्तीप्रमाणे नाईक यांनी ही खेळी खेळली आहे. स्वत:चा प्रभाग महिला झाल्याने तो सुनेला देऊन स्वत: प्रभाग क्रमांक ६० मध्ये उभे राहिलेले शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांची गाठ काँग्रेसच्या उत्तम जनसंर्पक असलेल्या अविनाश लाडबरोबर आहे. मोरे यांना मंडलिक यांचा अपशकुन झाला आहे. मंडलिक यांनी बंडखोरी केली आहे.

विकास आणि अपेक्षा
सेक्टर ५ ते ८ परिसरामध्ये महापालिकेच्या शाळेचे काम उत्तम झाले असून या परिसरात फेरीवाला मार्केटची उभारणी झाली नसल्याने फेरीवाल्यांना रस्त्यावर बसावे लागत आहे. नाल्यांचे कामदेखील अर्धवट अवस्थेत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोलमडून पडते. सेक्टर ६ व ७ च्या परिसरामध्ये वीजजोडण्यांसाठी असलेले डीपी बॉक्स नसल्याने अनियमित वीजपुरवठयाला सामोरे जावे लागते. या संपूर्ण परिसरात अनेक वेळा रात्रीचे पथदिवे बंद असतात. सेक्टर ९ व १० परिसरातील रस्ते सुस्थितीत असून पदपथाची दयनीय अवस्था झालेली आहे. या परिसरातील मोठा उघडा नाला बंदिस्त करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. सेक्टर १४ ते १८ मध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येतात. सेक्टर २१ व २२ मधील रस्ते, नाले, पदपथ सुस्थितीत असून रिकाम्या भूखंडावर मात्र डेब्रिज आढळून येते. बोनकोडेमध्ये फेरीवाला मार्केटचा विकास झालेला नाही. मात्र रस्त्यांची स्थिती चांगली आहे. रिक्षाचालक मनमानीप्रमाणे रिक्षा उभ्या करतात. खराणे गावत सर्वत्र बजबजपुरी अरुंद रस्ते, उघडे नाले, घुशींचा वावर अशा समस्या आहेत. एम जी कॉम्पलेक्स उघडा नाला बंदिस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जुहू गावात लॉजला परवानगी दिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. वाशी सेक्टर ९, १०, १५, १६ मधील बेकायदेशीर फेरीवाले हटवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशी बस स्थानकामागील परिसरात हॉलची संख्या अधिक असल्यामुळे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था चांगली असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशी सेक्टर ६, ७ हा उच्चभ्रू वसाहतीचा भाग असल्याने या ठिकाणी बस सेवा अधिक मोठय़ा प्रमाणात असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्र. क्र. ४६
कोपरखरणे रे.स्टेशन परिसर
मतदार ७४३३
राष्ट्रवादी – किसन मोरे
शिवसेना – विजयानंद माने
अपक्ष – संदीप राजपूत
प्र. क्र. ४७
कोपरखरणे से ८,
७ व ५चा भाग
मतदार ७४८०
राष्ट्रवादी – लता मढवी
भाजप – शुभांगी हंकारे
प्र. क्र. ४८
कोपरखरणे एमआयडीसी, कातकरी पाडा, श्रमिक नगर
मतदार ८१२७
राष्ट्रवादी – मनीषा भोईर
शिवसेना – सपना मुकादम
प्र. क्र. ४९
कोपरखरणे से. ९, १० व १२
मतदार ८३५५
राष्ट्रवादी – कोंडिबा तिकोने
शिवसेना – रामदास पवळे
प्र.क्र. ५०
बोनकोडे सेक्टर १२ गा.वि.यो
मतदार ५२४३
राष्ट्रवादी – लीलाधर पाटील
भाजप – वैभव पाटील
अपक्ष – हरिभाऊ म्हात्रे
प्र.क्र. ५१
कोपरखरणे से. १२ व १३ गा.वि.यो
मतदार ४९२२
राष्ट्रवादी – वैशाली नाईक
भाजप – वैष्णवी नाईक
प्र. क्र.५२
कोपरखरणे से. १४, १५ व १६ चा भाग
मतदार ५६०२
राष्ट्रवादी – शुभांगी सकपाळ
शिवसेना – निर्मला कचरे
प्र.क्र. ५३
जुहूगाव, वाशी से. १२
मतदार ६१३३
राष्ट्रवादी – प्रज्ञा भोईर
भाजप- शीतल भोईर
प्र. क्र. ५४
वाशी से.२८, २९ व १४ चा भाग
मतदार ८२७०
राष्ट्रवादी – शशिकांत राऊत
भाजप – कीर्ती राणा
काँग्रेस – प्रल्हाद शिंदे
प्र.क्र. ५५
खरणे गाव से. ११ व १२ गा. वि. यो.
मतदार ६१३३
राष्ट्रवादी – मुनवर पटेल
शिवसेना – विलास म्हात्रे
काँग्रेस – शाहीद करके
प्र. क्र. ५६
कोपरी गाव वाशी से. २६, २७
मतदार ५७४८
राष्ट्रवादी – उषा भोईर
शिवसेना – मंदा भोईर
प्र. क्र. ५७
एपीएमसी मार्केट
मतदार ५०७१
राष्ट्रवादी – विवेक पाटील
शिवसेना – विलास भोईर
काँग्रेस- गोपीनाथ मालुसरे
प्र.क्र. ५८
वाशी से. १४ व १५
मतदार ११४३६
राष्ट्रवादी – प्रकाश मोरे
भाजप – सुषेण सूर्यवंशी
प्र. क्र. ५९
जुहूगांव, वाशी से.१०
मतदार ४८६२
राष्ट्रवादी- प्रभाकर भोईर
भाजप – हरिशचंद्र भोईर
प्र.क्र. ६०
वाशी से. ९ व १०अ
मतदार ११५९०
शिवसेना – विठ्ठल मोरे
काँग्रेस -अविनाश लाड

प्रचारावर पाणी
अगोदरच कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असून घामाच्या धारा वाहत आहेत. त्यात इमारतींचा भाग असलेला प्रभाग असल्यावर तर उमेदवारांचे हाल अधिकच खराब झाले आहेत. चालण्याचा अनुभव आणि चढण्याची सवय असलेला उमेदवार मिळणे तसे विरळाच. त्यात प्रत्येक उमेदवाराकडे गाडी असल्याने आता प्रचाराला फिरणे म्हणजे शिक्षा झाली आहे. चढउतार, घोषणा, नमस्कार, चमत्कार यामुळे विविध पक्षांचे आणि नशीब आजमावायला उतरलेल्या अपक्षांचा प्रचार करून तोंडाला फेस येण्याची वेळ आली आहे. उन्हामुळे घामाच्या धारांनी दररोज स्नान होत असताना मंगळवारी संध्याकाळी तर अवकाळी पावसाने प्रचारावर अवकळा आणली. त्यामुळे अनेक उमेदवारांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. त्यात असा पहिला पाऊस म्हणजे छपरावरील घाण पडण्याचा दिवस. त्यामुळे अनेक उमेदवारांना अशा घाणीचा सामना करावा लागला. नवी मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मंगळवारची संध्याकाळ उमेदवारांची वाया गेली; मात्र या वातावरणाचा प्रचारातील काही तळीरामांनी चांगलाच फायदा करून घेण्याचे ठरविले आणि उमेदवाराकडून हातखर्च घेऊन मद्यशाळा गाठल्या. या पावसाने रोगराई, आजार वाढण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी आजारी तर पडणार नाही ना याचा धसका घेतला आहे. अवकाळी पावसाने काजू, आंबा, द्राक्ष, डाळिंब या उत्पादकांच्या कपाळावरच्या आठय़ा वाढविल्या आहेत. त्याचबरोबर आज नवी मुंबई पालिका क्षेत्रातील उमेदवारांनाही या पावसाने चिंताग्रस्त केले आहे. आज पडला तो पडला उद्या पडला तर काही खरे नाही, अशीच भावना सर्व उमेदवारांची होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2015 7:24 am

Web Title: power different political parties on ward level in navi mumbai mahanagar palika election
टॅग Political Parties
Next Stories
1 निवडणुकीत डझनभर स्थानिक नेतृत्वांची कसोटी लागणार
2 नियोजनबद्ध शहरात फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत
3 सातबारा- नवी मुंबई महापालिका निवडणूक
Just Now!
X