21 February 2019

News Flash

शिवाजीराव राऊत यांची जीवितास धोका असल्याची तक्रार

महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या जमीन खरेदी व्यवहारासंदर्भातील माहिती गोळा करणारे माहिती अधिकाराचे अभ्यासक शिवाजीराव राऊत यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री,

| February 23, 2014 01:48 am

पुणे येथील महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या जमीन खरेदी व्यवहारासंदर्भातील माहिती गोळा करणारे माहिती अधिकाराचे अभ्यासक शिवाजीराव राऊत यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दोन जणांनी आपल्याला, तुम्ही या प्रकरणात थांबला नाही तर सर्व मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, प्रभाकर देशमुख यांच्या (जांभे ता. सातारा येथील) बेकायदा जमीन खरेदीचे प्रकरण २०११ सालात शिवाजी राऊत यांनी शोधून काढले. तेथील ग्रामस्थांना आपल्या जमिनीची वस्तुस्थिती काय आहे हे माहीत नव्हते यासाठी त्यांनी अर्ज केले. अखेरीस ते प्रकरण जिल्हाधिकारी यांनी त्या जमिनीस अकृषक परवाना रद्द करुन पुण्यास पुढील तपासास पाठवले. या सगळ्याची परिणती म्हणजे प्रभाकर देशमुख यांचे स्न्ोही विजय धुमाळ आणि हेमंत िनबाळकर यांनी शिवाजी राऊत यांना दूरध्वनी केला. आम्हाला तुमची मदत पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  राऊत घराजवळील चौकात आपले मित्र साळुंखे यांच्यासह थांबले, तिथे धुमाळ आणि िनबाळकर यांनी राऊत यांना धमकी दिली. धुमाळ हे निवृत्त गटविकास अधिकारी आहेत. त्यांनी राऊत यांना गíभत इशारा देताना सांगितले, अमराठी आयएएस अधिकारी आणि भ्रष्ट प्रांताधिकारी हे देशमुख यांच्या मार्गात येत आहेत. देशमुख यांचे नाव पंतप्रधान पुरस्कारासाठी पहिल्या क्रमांकात आहे. आकसाने रंग देऊन देशमुख यांना त्रास दिला जातोय. जांभ येथील शेतकरी वर्गाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात, मात्र प्रकरण चिघळू देऊ नका अन्यथा आम्हाला सर्व मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी धमकी राऊत यांना दिली. यावर राऊत यांनी आपल्या जीवितास धोका आहे आणि त्याला धुमाळ तसेच िनबाळकर जबाबदार असतील. अशा परिस्थितीत त्यांच्या संरक्षणाची दक्षता घ्यावी, असे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, सातारा, पोलीस अधीक्षकांना दिले आहे. देशमुख यांच्या जमिनीवरील अकृषक हा परवानाही जिल्हा प्रशासनाने काढला आहे. मात्र अद्याप सर्वतोपरी दबावतंत्राचा वापर केला जात आहे.

First Published on February 23, 2014 1:48 am

Web Title: prabhakar deshmukh land purchase chapter satara
टॅग Prabhakar Deshmukh