28 February 2020

News Flash

पं. प्रसाद सावकार यांचा ‘पंचरत्न’ पुरस्काराने गौरव

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. प्रसाद सावकार यांना ‘पंचरत्न’ पुरस्काराने

| July 9, 2015 07:16 am

गेल्या सव्वाशे वर्षांपासून आजतागायत लोकप्रियता कायम राखलेल्या आणि रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असलेल्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकावर आधारित ‘सौभद्रायण’ हा कार्यक्रम १९ जुलै रोजी विलेपार्ले येथे रंगणार आहे. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. प्रसाद सावकार यांना ‘पंचरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. फाऊंडेशनर्फे यंदापासून ज्येष्ठ कलावंताचा ‘पंचरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून पहिला पुरस्कार पं. सावकार यांना प्रदान केला जाणार आहे. सन्मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि संगीत समीक्षक व गायक अमरेंद्र धनेश्वर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ तबलावादक पं. शशिकांत ऊर्फ नाना मुळ्ये यांचाही पंचाहत्तरीच्या निमित्ताने या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.

अवधूत गुप्ते ‘अतिथी संपादक’!
गायक अवधूत गुप्ते एका मासिकाचे ‘अतिथी संपादक’ झाले असून ग्रंथाली वाचक चळवळीच्या मासिक ‘शब्द रुची’साठी त्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने जुलै-ऑगस्ट महिन्याचा अंक संगीत व चित्रपट विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे.मराठी संगीत आणि चित्रपट असे दोन विभाग या अंकात आहेत. संगीतकार कौशल इनामदार, सलिल कुलकर्णी, , वैशाली सामंत , जसराज जोशी, दिलीप ठाकूर , विक्रम गायकवाड आदी लेख आहेत. गायक ऋषिकेश रानडे, मंगेश बोरगावकर, उर्मिला धनगर, आदर्श शिंदे, आर्या आंबेकर, सावनी रवींद्र, अभिनेता सुबोध भावे, स्वप्निल जोशी, मकरंद अनासपुरे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, वीणा जामकर यांची मनोगतेही अंकात आहेत. संपादन सहाय्य व मांडणी आल्हाद गोडबोले यांची असून सुरेश हिंगलासपूरकर हे अंकाचे संपादक आहेत.
प्रसाद ओक आणि
सुनील बर्वे यांची ‘जुगलबंदी’
अभिनयाबरोबरच सुश्राव्य आवाजाची देणगी लाभलेल्या मराठीतील प्रसाद ओक आणि सुनील बर्वे या दोघांनी ‘देऊळबंद’ या आगामी मराठी चित्रपटासाठी पाश्र्वगायन केले आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांतील संघर्ष संवादात्मक शैलीतून या गाण्यातून मांडण्यात आला आहे. चित्रपटाच्या शेवटी गाण्याचा काही अंशात्मक भाग प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर आधारित असलेल्या चित्रपटांतून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांची विचारसरणी, अध्यात्माबद्दलचे त्यांचे विचार व त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या संप्रदायाची माहिती सांगण्यात आली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा प्रवीण तरडे यांची असून दिग्दर्शन तरडे व प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपटाचे एक दिग्दर्शक व या गाण्याचे गीतकार प्रणीत कुलकर्णी म्हणाले, चित्रपटासाठी हे गाणे आम्हाला चित्रित करता आलेले नाही, पण चित्रपटाच्या शेवटी गाण्याचा काही अंशात्मक भाग प्रेक्षकांना ऐकता येईल.

First Published on July 9, 2015 7:16 am

Web Title: prasad raokar awarded by panchratna award
Next Stories
1 संशोधनाचा दर्जा वाढल्याचा विद्यापीठाचा दावा फोल
2 पादचारी भुयारी मार्गाची सुरक्षा वाऱ्यावर
3 ‘८ जानेवारी १९४७’चे प्रकाशन
Just Now!
X