News Flash

प्रतीक गाडेकर ‘साई फिटनेस श्री’चा मानकरी

प्रतीक गाडेकरने नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने व साई फिटनेस जीमतर्फे आयोजित पहिल्या ‘साई फिटनेस श्री २०१३’ चा मान मिळविला. उत्कृष्ठ प्रात्यक्षिककार

| April 3, 2013 02:13 am

प्रतीक गाडेकरने नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने व साई फिटनेस जीमतर्फे आयोजित पहिल्या ‘साई फिटनेस श्री २०१३’ चा मान मिळविला. उत्कृष्ठ प्रात्यक्षिककार म्हणून गणेश गांगुर्डेला गौरविण्यात आले.
गाडेकरला संघटनेचे राजेंद्र सातपूरकर, राजवंश पांडे, बबन बोडके यांच्या हस्ते चषक, किताब व रोख ११११ रुपये देऊन गौरविण्यात आले. गांगुर्डे   यास   राजाभाऊ जाधव, किशोर सरोदे, धनंजय काळे यांनी चषक व रोख रुपये ५५५ देऊन गौरविले.
स्पर्धेचे उद्घाटन महंत त्र्यंबकदास महाराज यांच्या हस्ते झाले. तीन वजनी गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत एकंदरीत ४८ स्पर्धकांनी भाग घेतला. सूत्रसंचालन राजेंद्र सातपूरकर यांनी केले. गटवार विजेत्यांमध्ये ५५ किलो गटात प्रतीक गाडेकर (प्रथम), वाल्मीक फलके (द्वितीय), शंतनू साळवे (तृतीय), ६० किलो गटात गणेश गांगुर्डे (प्रथम), अमृतसिंग राजपुरोहित (द्वितीय), जगदीश शर्मा (तृतीय), ६५ किलो गटात पुष्पराज निकम (प्रथम), नितीन गोरडे (द्वितीय) व अशोक निकाळजे (तृतीय) यांनी यश मिळविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:13 am

Web Title: pratik gadekar wins the sai fitness shree
Next Stories
1 विविध कार्यक्रमांमधून शिवरायांना अभिवादन
2 व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत वेळेच्या नियोजनावर भर
3 फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी
Just Now!
X